Coronavirus | एसटीच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या होत्या. मात्र 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यानं तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता पुढील आदेश मिळेपर्यंत एसटीची सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परवड होऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वीच फेब्रुवारी महिन्यात जेवढा पगार कर्मचाऱ्यांना दिलाय त्याच धर्तीवर मार्च महिन्याचा पगार देण्यात यावा असे आदेश एसटी प्रशासनाने निर्गमित केले होते. मात्र 31 मार्च रोजीच्या एसटीच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी यांच्या इमेल आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत अदा न करण्याबाबतचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. या आदेशामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola