Lockdown2 | ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून अंशतः सुरु होणार!
Continues below advertisement
राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरु होणार आहेत. इथल्या उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.
Continues below advertisement