Coronavirus Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 वर
कोरोनाची लागण झालेले मुंबईत दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११वर पोहोचली आहे. अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. ५ दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. बुधवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तरी, अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कुणा कुणाच्या संपर्कात आली याचा शोध घेणे सुरू आहे. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
Tags :
Maharashtra Patients CoronaVirus Outbreak Corona In Maharashtra Coronavirus Coronavirus Update Covid 19