Coronavirus Effect | सरकारच्या आदेशानंतर स्विमिंग पूल बंद, राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू
कोरोनाची वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने खबरदारी म्हणून 14 मार्च मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर या शहरामधील जलतरण तलाव, चित्रपटगृह, नाट्यगृह, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा आदेश रविवार असताना देखील देण्यात आला.