Coronavirus in Vidarbha | कोरोना वाढतोय, काळजी घ्या; विदर्भातील 'या' जिल्ह्यांत निर्बंध
मराठवाडा आणि विदर्भात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळं अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याबाबत परिस्थिती बघून निर्णय होण्याची शक्यता आहे. अकोला पाठोपाठ बुलढाणा, जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. सणसमारंभ, उत्सव, विवाह सोहळ्यात ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच पाचवी ते नववीपर्यंचच्या शाळा २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मोर्चे, मिरवणुका, रॅली यावरही बंदी घालण्यात आली आहे.
Tags :
Coronavirus In Vidarbha Coronavirus Cases Increasing In Vidarbha Maharashtra Lockdown 7 Lockdown In Maharashtra Lockdown Lockdown Guidelines Maharashtra