Coronavirus | बीडमध्ये कोरोनावरून राजकारण? क्षीरसागर कुटुंब होम क्वॉरन्टाईन
बीडच्या राजकारणात चांगला दबदबा असलेले क्षीरसागर कुटुंब होम क्वॉरन्टाईन करण्यात आल्याने कोरोनाच्या संदर्भातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. आधी फक्त शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वॉरन्टाईन केले होते. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. अख्खं क्षीरसागर कुटुंबालाच होम क्वॉरन्टाईन होण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. यासंबंधी आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः फेसबूक पोस्ट लिहून खुलासा केला आहे.