Gold Mask | कोरोनाकाळातही प्रसिद्धीचा सोस, बार्शीतील तरुणाने बनवून घेतला सोन्याचा मास्क
Continues below advertisement
हौसेला मोल नाही असे म्हणतात, त्यामुळे कोण काय करेल ते सांगता येणार नाही. आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी लोक काहीही करीत असतात. बार्शी येथील एका युवकाने चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संबंध जगाला वेठीस धरलं आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी अनेकजण लढा देत आहेत. पण या संकटातही काही लोकांना प्रसिद्धीचा असलेला सोस पाहायला मिळतो.
Continues below advertisement