Corona Vaccine | प्रत्येक जिल्हा लसीकरणासाठी सज्ज; 16 जानेवारीला प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार

Continues below advertisement

राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्या पाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोसेस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कुपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधतील, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram