पंढरपुरात दुकाने चालू ठेवण्यासाठी कोरोना चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक, चाचणीसाठी व्यापाऱ्यांची झुंबड

Continues below advertisement

पंढरपूर : सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली असताना प्रशासनाने हा फैलाव रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोना तपासणी बंधनकारक करून दोन दिवसांची मुदत दिली आहे. कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात लावल्याशिवाय दुकाने उघडता येणार नसल्याने आता व्यापाऱ्यांनी नगरपालिका रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. 

 

एका बाजूला गर्दी करू नये असे आवाहन प्रशासन करत असताना चाचणी करायला थोडाच अवधी दिल्याने व्यापाऱ्यांची तपासणी केंद्रावर झुंबड उडाल्याचे चित्र दिसत आहे. या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढण्यापेक्षा प्रशासनाने नियोजनबद्ध कोरोना तपासणीचे वेळापत्रक व्यापाऱ्यांना दिल्यास कोरोना चाचण्यांसाठी अशी धोकादायक गर्दी होणार नाही. 

 

मात्र प्रशासनाचे सध्या कोरोनापेक्षा निवडणुकीवर जास्त लक्ष असल्याने कोरोनाचा गंभीर विषयावर नियोजन करायला अधिकाऱ्यांना वेळच नसल्याचे दुर्दैवी चित्र पंढरपुरात दिसत आहे. आपल्याला दुकान उघडायला मिळावे यासाठी प्रत्येक लहान मोठा व्यापारी तपासणीसाठी दिवसभर गर्दी करीत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याचा धोकाच अधिक आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram