
Corona Self Test Kit :औषध विक्रेत्यांना सेल्फ टेस्ट किट विकत घेणाऱ्यांची माहिती संकलित करणं बंधनकारक
Continues below advertisement
औषध विक्रेत्यांना सेल्फ टेस्ट किट विकत घेणाऱ्यांची माहिती संकलित करणं बंधनकारक करण्यात आलंय.. मुंबई महापालिकेनं या निर्णयानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. ज्यांना कोरोना चाचणीसाठी सेल्फ टेस्ट किट विकत घ्यायची आहे त्यांना औषध विक्रेत्यांना आधार कार्ड दाखवावं लागणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी ही माहिती दिलीय. सेल्फ टेस्ट किटच्या मदतीनं घरीच कोरोनाची चाचणी करण्यात येते. मात्र अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दडवत असल्याचे प्रकार समोर आलेत. त्यामुळं मुंबई महापालिकेनं सेल्फ टेस्ट किट खरेदी-विक्रीसाठी नवे निर्बंध लागू केलेत.
Continues below advertisement