corona self covid test kit : घरीच केल्या जाणाऱ्या अँटीजेन चाचणी किटच्या मागणीत तीव्र वाढ :ABP Majha
Continues below advertisement
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घरीच केल्या जाणाऱ्या अँटीजेन चाचणी किटच्या मागणीत झालेली तीव्र वाढ आरोग्य विभागासाठी चिंतेचे कारण बनले आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा अनेक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसेल. कारण पॉझिटिव्ह व्यक्ती संबंधित एजन्सींना त्याची माहिती देत नाहीत. घरीच चाचणी केलेल्यांपैकी किती जण पॉझिटिव्ह आले याचा आकडाही हजारोंच्या वर असेल, असेही सांगितले जात आहे. मुंबईत हजारो कोविड सेल्फ टेस्टचे अहवाल असे आहेत, ज्यांची नोंद झालेली नाही. असे अहवाल पालिकेला मिळत नसल्याने रुग्णांचा नेमका आकडा समजत नाही. सध्या मुंबईसह राज्यात होम कोविड अँटीजेन चाचणी किट्सची विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येतील लपवाछपवी आणि त्यातून त्यांना शोधणे एक प्रकारचे आव्हान आहे
Continues below advertisement