Corona चा नवा NeoCov Variant पसरूच शकत नाही, प्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे यांचं मत
Continues below advertisement
दक्षिण आफ्रिकेमधील वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा अवतार सापडला आहे. पूर्वीच्या रुपांपेक्षा कोरोनाचे हे नवे रुप अत्यंत प्राणघातक आणि वेगाने बाधित करणारे असल्याचं चीनमधील शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. निओकोव्ह असं या नव्या व्हेरियंटचं नाव आहे. चीनमधील शास्त्रज्ञांनी हा दावा केला असून त्याबाबतचे वृत्त रशियातील स्पुटनिक या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. सध्या तरी हा निओकोव्ह व्हेरियंट माणसांमध्ये आढळलेला नाही... डेल्टा, डेल्टा प्लस आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या तीन रुपांनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉनमुळे आलेली लाट अजून ओसरलेली नाहीये. अशातच कोरोनाचं नव रुप वटवाघळांमध्ये सापडल्याने चिंता वाढली आहे.
Continues below advertisement