Maharashtra Corona : राज्यात पुन्हा कोरोना वाढतोय? काल दिवसभरात डिसेंबरनंतर सर्वाधिक रुग्णवाढ

Continues below advertisement

मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव मुंबईत पुन्हा एकदा होताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्णांची दैनंदिन संख्या 500 पेक्षा कमी होती, आता कोरोना रूग्णांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. रविवारी मुंबई शहरात 645 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 314076 वर पोहोचली आहे. तर आजवर एकूण 11419 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


सक्रिय रूग्णांविषयी सांगायचे तर मुंबईत सध्या 5068 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई मंडळात 1141 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. तर 13 लोकांच्या मृत्यू झाला आहे. मुंबई मंडळातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 704561 झाली आहे. आतापर्यंत 19685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई मंडळात मुंबई शहर आणि त्याच्या उपनगराचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram