लातूरमधील कोथिंबीर शेतकरी उत्पादक चिंतेत, बाजारपेठा बंद असल्याने 5 एकर शेतीवर फिरवावा लागला नांगर

Continues below advertisement

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका आता भाजीपाल्यालाही बसतोय.वाढत्या करोना संसर्गामुळे बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी आता चांगलाच अडचणीत सापडलाय. बाजारात सध्या कोथिंबिरीला सध्या कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचाही खर्च निघत नसल्याने लातूर जिल्ह्यातील उटी गावातल्या एका शेतकऱ्याने आपल्या पाच एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवला. कोथिंबिर लागवडीसाठी त्यांना आत्तापर्यंत 81 हजारांचा खर्च आला आहे. यातून मोठा नफा मिळेल अशी त्यांना आशा होती. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाजार ठप्प आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतावर नांगर फिरवला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram