Maha Politics Row: सहकार मंत्र्यांची पुन्हा फटकेबाजी, नांदेडमधील वक्तव्य चर्चेत

Continues below advertisement
नांदेडमध्ये (Nanded) झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'तुमच्या बँका खाली का? बँक कोठे गेली पाहिजे?' असा थेट सवाल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात विचारला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले होते. या नव्या भाषणात त्यांनी विदर्भातील एका माजी वस्त्रोद्योग मंत्र्याचा उल्लेख केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रताप पाटील आणि दादांचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. याआधीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola