Zero Hour : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण, नवा वाद पेटला
Continues below advertisement
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात (Shaniwar Wada) नमाज पठण केल्याच्या व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चर्चेदरम्यान, 'तुम्ही तुमची भक्ती तुमच्या तुमच्या मर्यादेत करा, तुम्ही मर्यादा का ओलांडताहे?' असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या नियमांनुसार, संरक्षित वास्तूमध्ये धार्मिक प्रार्थना करण्यास मनाई आहे, केवळ अशा ठिकाणी प्रार्थना केली जाऊ शकते जिथे स्मारक ताब्यात घेताना प्रार्थना होत असे. या प्रकरणी पुणे मनपाच्या 2018 च्या जीआरचाही उल्लेख करण्यात आला, ज्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अशा कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. चर्चेत माधवराव पेशव्यांनी चर्चसाठी जागा दिल्याचा संदर्भ देत पुण्याच्या सहिष्णू परंपरेचाही उल्लेख करण्यात आला. मात्र, त्याचवेळी पुण्येश्वर मंदिर आणि इतर अतिक्रमणांचे मुद्देही मांडण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement