Container Fire : 40 फ्रीजसह कंटेनर जळून खाक, Delhi हून Chennai च्या दिशेनं निघालेला कंटेनर

Continues below advertisement
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी-नांदेड महामार्गावर (Kalamnuri-Nanded Highway) दातीपाटीजवळ एका कंटेनरला भीषण आग लागली. दिल्लीहून (Delhi) चेन्नईच्या (Chennai) दिशेने ४० फ्रीज घेऊन निघालेल्या या कंटेनरच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ कंटेनरमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. या आगीच्या घटनेत संपूर्ण कंटेनर आणि त्यातील ४० फ्रीज जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, या दुर्घटनेत कंटेनरचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola