Naseem Khan : 'महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल' ABP Majha
Continues below advertisement
Vidhan Parishad Election 2022 : एकीकडे शिवसेनेत राजकीय भूकंप होण्याची चिन्हं असताना काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवानं प्रचंड नाराजी आहे. यापुढे महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल, असं निर्वाणीचं वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी केलं आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement