Web Exclusive : Amravati जिल्हा बँकेत पुन्हा Yashomati Thakur यांचा दणदणीत विजय : ABP Majha

Continues below advertisement

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अखेर पुन्हा मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं.आज झालेल्या मतमोजणी नंतर यशोमती ठाकूर यांच्या पॅनलला 21 पैकी 14 जागा मिळाल्या तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पॅनलला 6 जागेवरच समाधान मानावं लागलं. यामध्ये एक जागा अपक्षने घेतली.  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं सहकार पॅनल आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचं परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत झाली होती. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडूसह तीन आमदार आणि अन्य दिग्गज नेते मैदानात उतरले होते. या सगळ्यांचा फैसला आज  झाला.. यामध्ये दोन आमदारांचा पराभव ही झाला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram