Yashomati Thakur | 'कामं होतं नसतील तर दंगा करा' यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

Continues below advertisement
'कामं होतं नसतील तर दंगा करा' असा अजब सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. तर शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जाण्याचा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. काल सोलापुरात झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्र्यांनी हा सल्ला दिला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर हे दोघेही शनिवारी सोलापुरात कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस कमिटीत घेतली. या कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्येच एका कार्यकर्त्यांने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर कामे होत नसल्याचं सांगितले. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.\
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram