Vijay Waddettiwar On Congress : विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय पडली आहे
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात (BMC Elections) केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'हायकमांशी या सगळ्याविषयी चर्चा झाली आहे आणि आगामी मुंबई महानगरपालिका ही काँग्रेस स्वबळावरती लढेल', अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) हे देखील 'एकला चलो'चा नारा देत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये (MVA) मनसेला (MNS) सोबत घेण्यावरून चर्चा सुरू असताना, काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील पक्ष संघटना मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement