Congress Maharashtra Politics: काँग्रेस स्वबळावर लढणार, मुंबईत काँग्रेस एकला चलो रे, महाविकास आघाडीत फूट?

Continues below advertisement
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘शेतकरी काय भिकारी आहेत काय? विखे पाटलांना लाज वाटत नाही काय? आपण काय बोलतो त्याची,’ अशा शब्दात वडेट्टीवार यांनी विखे पाटलांवर घणाघात केला. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असली तरी, समविचारी पक्षांकडून प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, विखे पाटलांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून, बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. वडेट्टीवार यांनी बच्चू कडूंच्या रागाचे समर्थन केले, पण गाडी फोडण्यापर्यंत बोलणे उचित नसल्याचेही म्हटले. 'विखे पाटलांना शेतकऱ्यांनी चिखलाचा प्रसाद दिला पाहिजे,' असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola