BMC Elections: मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 'एकला चलो रे'चा सूर

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत खलबतं सुरू आहेत. काँग्रेसने मनसेबाबत (MNS) 'नो कॉम्प्रोमाईज' धोरण स्वीकारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 'काँग्रेसकडून मनसेबाबत नो कॉम्प्रोमाईज धोरण स्वीकारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.' राज्यातील नेत्यांनी मुंबई महापालिकेसाठी एकट्याने लढण्याची आग्रही मागणी केली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'एकला चलो'ची भूमिका स्वीकारली आहे. मनसेसोबतच्या युतीवरून दिल्ली आणि राज्यातील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचेही समोर आले आहे. दिल्लीतील नेते मनसेसोबतच्या चर्चेला अनुकूल असले तरी, राज्यातील नेते मात्र विरोधात आहेत. या सर्व घडामोडींवर आज दुपारच्या बैठकीनंतर काँग्रेसकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola