Godse Remark Row: 'फडणवीसांवर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका
Continues below advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. 'मुख्यमंत्री फडणवीसांची मोडस ऑपरेंडी ही नथुराम गोडसेप्रमाणे आहे', असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे. ज्याप्रमाणे नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शांतपणे मुख्यमंत्री फडणवीस जाती-जातींमध्ये भांडणं लावून देत आहेत, असे सपकाळ म्हणाले. आपण व्यक्तीची नव्हे, तर कार्यपद्धतीची (modus operandi) तुलना करत असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. यासोबतच, '२०१४ मध्ये आधी पार्लमेंटच्या पायरीवर नतमस्तक व्हायचे आणि आता लोकशाहीचा खून करायचा', अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement