War of Words: 'फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे', सपकाळ यांचे वादग्रस्त वक्तव्य

Continues below advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केलेल्या घणाघाती टीकेमुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. 'अगदी ज्या शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) खून केला होता, अगदी तितकंच शांत राहून ते (फडणवीस) जाती-जाती-धर्मा-धर्मात भांडणं लावत आहेत', असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे. फडणवीसांची कार्यपद्धती (modus operandi) ही नथुराम गोडसेप्रमाणे असल्याची तुलना त्यांनी केली, मात्र व्यक्ती म्हणून तुलना केली नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. यासोबतच, 'ज्याप्रमाणे नथुरामने आधी गांधीजींच्या पाया पडून नंतर खून केला, त्याचप्रमाणे २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी आधी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं आणि आता ते लोकशाहीचा खून करत आहेत', असा हल्लाबोलही सपकाळ यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola