Vidhan Parishad Election : भाजपच्या लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप ABP Majha
Continues below advertisement
Vidhan Parishad Election : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जगताप यांच्या ऐवजी त्यांची मतपत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती ठिक नाही. परंतु, या दोन्ही आमदारांनी विधानपरिषदेसाठी मतदान केले आहे. मात्र, लक्ष्मण जगताप यांची मतपत्रिका त्यांच्याऐवजी इतर कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुक्ता टिळक यांच्याही मतावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
Continues below advertisement