Congress :बैठकीत सहभागी न होताच ऊर्जामंत्री नितीन राऊत माघारी,वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य
abp majha web team
Updated at:
27 Jan 2022 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेची महाविकास आघाडीत होणारी कुचंबणा, आणि आगामी निवडणुका याबाबत खलबतं करण्यासाठी आयोजित काँग्रेसच्या बैठकीत आज नाराजीनाट्य पाहायला मिळालं. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत इथे आले खरे .. मात्र बैठकीत सहभागी न होताच काही वेळा ते इथून निघूनही गेले. आपल्याला बैठकीचं निमंत्रण मिळालं नसल्याचं नितीन राऊत यांनी एबीपी माझाला सांगितलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत कुचंबणा होत असल्याची तक्रार करणाऱ्या काँग्रेसच्या गोटातही सारंकाही आलबेल नाही हे स्पष्ट होतंय