Sharad Pawar | Maharashtra Politics | ठाकरे सरकार स्थिर, राष्ट्रवादी-काँग्रेस पाठीशी मजबूत: शरद पवार
Continues below advertisement
राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. या कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं, यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यपालांच्या भेटीसंदर्भात ते म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असं राज्यपाल काल म्हणाले, असंही पवार यांनी सांगितलं.