Sudhir Mungantiwar | काँग्रेस, राष्ट्रवादीचं मराठा आरक्षणाकडं दुर्लक्ष : सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर तरतुदी समजावून घेत मार्ग काढावा असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलंय. सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अतिशय गंभीरपणे प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सीबीआय-ED यावर मंत्रिमंडळाचा वेळ खर्च केला. मात्र, दिल्लीत कुणीही बसले नाही अशी टीका केली. त्यांच्या मते चाळीस वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ सत्ता उपभोगली. मात्र, मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याची गरज आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola