काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक,सायटोमॅगीलो विषाणूचा संसर्ग, आरोग्यमंत्र्यांची माहिती
जालना : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला आहे. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला असून या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली आहे. मात्र, त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.