Rajkiya Aatishbaji 2025 | Prashant Padole | मोदी फुसका फटाका,राहुल गांधी ॲटमबॉम्ब : खा.प्रशांत पडोळे

Continues below advertisement
भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिवाळीच्या फटाक्यांच्या खरेदीतून सत्ताधाऱ्यांवर जोरदार राजकीय हल्लाबोल केला आहे. विविध फटाक्यांना राजकीय नेत्यांची उपमा देत त्यांनी डबल इंजिन सरकारवर निशाणा साधला. 'राहुल गांधी हे ॲटमबॉम्बसारखे आहेत आणि तो फुटला तर सरकारच पडून जाईल,' असा खळबळजनक दावा पडोळे यांनी केला आहे. त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना 'फुसकी फटाका' म्हटले, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 'मटक्या'सारखे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 'अनार' असल्याचा टोला लगावला. इतकेच नाही, तर महसूल मंत्री 'रॉकेट'प्रमाणे असून भंडाऱ्याची रेती उडवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. नाना पटोले यांची तुलना 'हायड्रा'शी करत, त्यांना जेवढे कापले जाईल तेवढे ते पुन्हा उगवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आणि सरकारच्या योजनांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola