Congress on Ranjeet Savarkar: रणजित सावरकरांनी गंभीर आरोप केल्यानंतर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. पण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींचे पणजोबा आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रणजीत सावरकरांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. पंडित नेहरुंनी एका बाईसाठी देशाची फाळणी केली असा आरोेप सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी केला. पंडित नेहरुंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी करण्यात आली, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola