Rajendra Mulak:राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा?मुळकांवर कारवाई होऊनही काँग्रेस नेते व्यासपीठावर
विदर्भात काँग्रेस ठाकरे गटाशी दगाबाजी करत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. रामटेकचे बंडखोर नेते राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा आहे का असा सवाल उपस्थित झालाय. काल सकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते. तर संध्याकाळी स्वतः मुळक शेजारील मतदारसंघ उमरेडमध्ये काँग्रेस उमेदवार संजय मेश्रामांच्या प्रचाराला उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस पक्षातून आणि जिल्हाध्यक्षपदावरून राजेंद्र मुळक यांची हकालपट्टी फक्त देखावा होती का, ती शिवसेना ठाकरे गटाला भुलवण्यासाठी होती का असा प्रश्नही निर्माण झाला आहे...