Atmanirbhar Bharat Abhiyan | विशेष पॅकेजमध्ये आरबीआयने दिलेली मदत गृहित धरु नये : पृथ्वीराज चव्हाण

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये रिझर्व्ह बँकेने दिलेलं मदत गृहित धरली तर ते दुर्दैवी असेल, त्याला अर्थ राहणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी काल (12 मे) 'आत्मनिर्भर भारत अभियान' अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं. या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. विशेष म्हणजे कोरोनामुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारने 21 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करावं, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram