Congress : काँग्रेस श्रेष्ठींनी दिलेला खर्च पाळला नाही, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा गौप्यस्फोट
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मला पक्षश्रेष्ठींनी जो शब्द दिला, तो पाळला नाही असा गौप्यस्फोट एबीपी माझाशी बोलताना केला. नाव घेण्यास नकार देत त्यांनी स्पष्ट संकेत देत म्हटले की हे ते नेतृत्व आहे जे सर्वात मोठे, ज्येष्ठ आहे. डॉक्टर सुनील देशमुख यांच्या काँग्रेसमध्ये घर वापसीचे निमित्त साधून ते बोलत होते. त्यामुळे भाजपसोडून काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्याआधी डॉक्टर देशमुखांनी खात्री करून घ्यावी असे ही ते म्हणाले.