Congress : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त कली खदखद
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल असल्याचं पक्षाचे वरीष्ठ सांगत असले तरी पक्षातले अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी खदखद बोलून दाखवली आहे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी... काँग्रेसचे मंत्री आमदारांनाच मदत करत नसल्याचं सांगताना त्यांनी बाळासाहेब थोरातांची लेखी तक्रार सोनिया गांधींकडे करणार असल्याचं म्हटलंय. राज्यातली वरीष्ठ नेत्यांवर भरवसा नसल्याचं सांगताना त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उदासीन असलेल्या ज्येष्ठ काँग्रसेस नेत्यांचीही तक्रार करणार असल्याचं सांगितलंय