Nana Patole : काँग्रेस हायकमांडचा नाना पटोलेंना झटका, जागा वाटपाच्या यादीतील वगळली नावं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडने मोठा झटका दिलाय. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी तयार केलेल्या यादीतील नावं वगळली आहेत. काँग्रेस समन्वय समितीतील सदस्यांची नावं वगळली आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर आता नवीन नावं दिली जाणार आहेत. तर काँग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल यांनी पटोलेंना तंबी दिली असून, 'जागा वाटप आणि इंडिया आघाडीसंदर्भात निर्णय घ्यायचा नाही, असं केसी वेणूगोपाल म्हणालेत. असंही सूत्रांकडून कळतंय.