Congress CM Karnataka : कर्नाटकचे मुख्यमंत्री निवडण्याचे सर्व अधिकार खर्गेंकडे, बैठकीत निर्णय
कर्नाटकच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडीचे सर्वाधिकार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आलेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आलेत. त्यानंतर लगेचच ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना उद्या दिल्लीचं बोलावणं आलं आहे. संपूर्ण बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू केलीय. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आज जोरदार घोषणाबाजी केली तसेच होर्डिगबाजीही केली. अगदी संख्याबळाच्या जोरावर म्हणायचं तर डीके शिवकुमार यांना ६८ आमदारांचा तर सिद्धरामय्या यांच्या पाठिशी ५९ आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, सत्तास्थापनेचा भाग म्हणून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना बंगळुरूत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलंय.. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह एकूण तीन निरीक्षक आहेत.