Punjab Elections:पंजाबमध्ये काँग्रेसचा हात कुणाच्या पाठीशी? मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचा चेहरा कोण?
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे कळण्यासाठी अजूनही महिन्याभराचा अवधी आहे. पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसचा चेहरा कोण असणार आहे, याची कल्पना दोन दिवसांत येईल. खरं तर नवज्योतसिंग सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे. त्यामुळं त्या दोघांपैकी काँग्रेसमध्ये नेमकं कुणाकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातंय हा अजूनही प्रश्न आहे. पण राहुल गांधीनी दोन दिवसांपूर्वी घोषणा केलीय की काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार. त्यामुळं सिद्धू आणि चन्नी या दोन्ही नेत्यांमध्ये उशिरा का होईना चढाओढ सुरु झालीय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.