
Bhai Jagtap on Nitin Raut : प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू : भाई जगताप
Continues below advertisement
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच निशाणा साधलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णय प्रशासन मानत नाही, अशा शब्दांत जगताप यांनी महापारेषणच्या कारभारावर टीका केली. लोकाचे प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना भेटून मागू असा इशाराही त्यांनी दिलाय. महापारेषण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बीकेसीतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय.
Continues below advertisement