NCP - Congress Loksabha Seats : राष्ट्रवादीच्या ताब्यातील भंडारा- गोंदिया लोकसभेवर काँग्रेसचा दावा

Continues below advertisement

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत पूर्व विदर्भातील लोकसभेच्या जागांबाबत पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सर्व निवडणुका एकत्र लढणार असून, अद्याप जागावाटप झालेलं नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भंडारा - गोंदिया लोकसभेवर काँग्रेसनं दावा केलाय. अशात आता काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी लागलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर 'भावी खासदार' असा उल्लेख बघायला मिळाला. सेवक वाघाये यांच्या या बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून वाघाये यांच्या माध्यमातून काँग्रेस ही जागा लढणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram