Voter List Scam Thackeray vs Congress: मतदार याद्यांमध्ये घोळ? काँग्रेस-ठाकरे गटात श्रेयवादाची लढाई

Continues below advertisement
मतदार याद्यांमधील (Voter List) घोळावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दोन्ही एकाच मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे हा मुद्दा सर्वप्रथम देशासमोर मांडल्यानंतर, आता काँग्रेस उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे घोळ केला जातो हे उघड करणार आहे. विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे देखील 'निर्धार मेळाव्यात' मुंबईतील मतदार याद्यांमधील घोटाळ्यावर सादरीकरण करणार होते, पण त्याआधीच काँग्रेसने पत्रकार परिषद जाहीर केली आहे. त्यामुळे एकाच मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकी आहे की, हा मुद्दा स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola