Shivsena Bhawan : शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार
Continues below advertisement
शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलीय... योगेश देशपांडे यांनी ही तक्रार केलीय... एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरू दिली, यावर आक्षेप घेत त्यांनी ही तक्रार केलीय.. शिवसेना भवन वास्तू ही शिवाई पब्लिक ट्रस्टची जागा असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. जर असा वापर ट्रस्टच्या उद्दिष्टांचे उल्लंघन करत असेल, तर विश्वस्तांना का निलंबित किंवा काढलं का जाऊ नये आणि प्रशासक का नियुक्त करू नये आणि आतापर्यंत झालेले नुकसान विश्वस्तांकडून का वसूल केले जाऊ नये? असे प्रश्न त्यांनी आपल्या तक्रारीतून केले आहेत
Continues below advertisement
Tags :
Complaint Political Party Charity Commissioner Shiv Sena Bhavan Shivai Trust Yogesh Deshpande Vastu Of Trust Shivai Public Trust Violation Of Objectives