Devendra Fadnavis यांच्याविरोधात तक्रार, कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार, काय आहे प्रकरण?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण 2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या 2 केसेसची माहिती लपवल्याचे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. नागपूरचे Adv. सतीश उके ह्यांनी फडणवीसांच्या विरोधात तक्रार केली होती.
त्याच प्रकरणात जे एम एफ सी म्हणजेच प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी कोर्टात देवेंद्र फडणवीस विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहे.