Bigg Boss | जान कुमार सानूच्या वक्तव्याबद्दल कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केल्यानंतर अखेर कलर्स टीव्हीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना आणि मनसेने दिला होता.