Colonel Patwardhan Pahalgam Attack : येत्या काही दिवसांत सैन्य दलांच्या कारवाईची अंमलबजावणी दिसेल

Continues below advertisement

Colonel Patwardhan Pahalgam Attack : येत्या काही दिवसांत सैन्य दलांच्या कारवाईची अंमलबजावणी दिसेल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करताय, असं समोर आले आहे. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता. 

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे. हाशिम मुसा गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी असलेलं कनेक्शन उघड झालंय. पण त्याचं थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती-

दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधीही आला काश्मिरात होता. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होते. याबाबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातून पुरावे आढळले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola