CNG PNG Hike : ग्राहकांवर महागाईची कुऱ्हाड, अवघ्या पाच दिवसात CNG 7 तर PNG 5 रूपयांनी महागला

अवघ्या पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा दिला होता मात्र हा दिलासा अल्पायुषीच ठरला कारण या निर्णयानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकदा सीएनजी, पीएनजी दरवाढीची कुऱ्हाड ग्राहकांवर कोसळली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत ५ रुपयांची वाढ झालेय. एक एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र आज झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत. सीएनजीची किंमत 67 रुपये तर पीएनजीची किंमत 41 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे.  त्यामुळे व्हॅट दरात केलेल्या कपातीचा फायदा ग्राकहांना नाहीच हे स्पष्ट झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola