CNG Gas: घरगुती पाईप गॅस दीड रुपयाने महागला ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. सीएनजी प्रतिकिलो अडीच रुपयांनी महागलाय तर पीएनजी अर्थात घरगुती पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट दीड रुपयांची वाढ झालीय. मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालीय. दरवाढीनुसार सीएनजी प्रतिकिलो ६६ रुपये तर घरगुती गॅस ३९.५० रुपयांमध्ये उपलब्ध होईल. सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने अधिक दरात गॅस आयात केलाय. त्यामुळे ही दरवाढी करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलंय. याआधी डिसेंबरमध्ये सीएनजीच्या दरात दोन रुपये तर पीएनजीच्या दरात दीड रुपयांनी वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये सीएनजी ३. ९६ रुपयांनी तर पीएनजी २.५७ रुपयांनी महागला होता. ऑक्टोबरमध्येही दरवाढ झाली होती. गेल्या वर्षभरात सीएनजी १८ रुपयांनी महागलाय.
Continues below advertisement