CM Uddhav Thackeray At Sangli : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सांगली दौरा
मी पॅकेज घोषित करणारा नव्हे तर प्रत्यक्ष मदत करणारा मुख्यमंत्री, असं विधान २ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी केलं. त्यानुसार मदत करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याआधी त्यांनी महाडमधील तळीये, चिपळूण आणि कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतलाय. तरी, आज मुख्यमंत्र्यांचा सांगली जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. यावेळी ते सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करतील आणि स्थानिकांशी संवाद साधतील.