CM Uddhav Thackeray | अडचणीच्यावेळी राजकारण करणं हे माझ्या संस्कृतीत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Continues below advertisement
काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केलं नाही. आज गोरगरीबांना अन्न मिळणं, उपचार मिळणं हे महत्वाचं आहे. आपण गरीबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिलं. 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? असा टोला देखील त्यांनी लगावला. आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement